आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, काय असतो \'हॅलोवीन डे\'? अशा भयावह रुपात दिसले कलाकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
31 ऑक्टोबर हा दिवस जगभरात 'हॅलोवीन डे' म्हणून साजरा झाला. सेलिब्रेटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वांनीच विविध भयावह वेशभूषा करून मोठ्या धूमधडाक्यात हा दिवस सेलिब्रेट केला. प्रियांका चोप्रा, श्रध्दा कपूर, आदित्य कपूर, सुझान खानने आपल्या मुलांसह आणि इतर बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलेब्सनीसुध्दा 'हॅलोवीन डे' साजरा करणे पसंत केले.
काय असतो 'हॅलोवीन डे' हे कदाचितच कुणाला ठाऊक असेल. चला जाणून घेऊया या दिवसाचे महत्व आणि का केला जातो साजरा...तोही अशा अगळ्या-वेगळ्या पध्दतीने...
हॅलोवीन इतिहास हा प्राचीन ब्रिटन आणि आयरलँडमधील केल्टिक संस्कृतीशी जोडलेला आहे. 31 ऑक्टोबर हा दिवस त्या काळी उन्हाळ्याचा शेवटचा दिवस म्हणून मानला जात होता. त्यामुळे या दिवसांत शेतीची बरीच कामे संपवली जात. तसेच, या वर्षभरात जे कुणी मरण पावले त्याचे मृतात्मे घरी परतण्याची ही वेळ मानली जात.
पौराणिकानुसार, या दिवशी नवीन शरीरे शोधायची संधी मृतात्मांना मिळत असे, त्यामुळे ते शरीरांच्या शोधात गावांत प्रवेश करत असे. आत्मे आपले जग सोडून जिवंत माणसांच्या जगात प्रवेश करणारा हा दिवस मानला जात असे. या दिवशी मृत्यांनी आपल्या शरीरावर ताबा मिळवू नये म्हणून भूतांना पळवून लावण्यासाठी गावकरी गावाबाहेर मोठा जाळ करत. सोबतच, भयानक मुखवटे व भितीदायक वेशभूषा करतात. त्यामुळे नव्या शरीरांच्या शोधात येणा-या मृतात्मांना खरी माणसे कोण आहेत हे समजणे कठिण जाते, असे गावक-यांची धारणा असे. इसवी सनानंतर सुमारे सातव्या शतकात 1 नोव्हेंबर हा संताचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.
या दिवशी चर्चकडून संतपद मिळवलेल्या किंवा न मिळवलेल्या सर्व संतांचे स्मरण केले जाते, यालाच 'ऑल हॉलोज डे' किंवा 'हॉली डे' (Holy Day- पवित्र दिवस) मानले जाऊ लागले. याच दिवशीची पूर्वसंध्या 'हॅलोवीन' म्हणून साजरी केली जाऊ लागली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सेलेब्सनी कशाप्रकारे साजरा केला 'हॅलोवीन डे'...