आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hamari Adhuri Kahani Cannot Be Made Without Vidya Balan

‘हमारी अधुरी..’मधील विद्याचे स्थान कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘एक व्हिलन’ने 100 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केल्याने मोहीत सुरीचे बॉलीवूडमधील महत्त्व वाढले आहे. आता प्रेक्षकांना मोहीतच्या ‘हमारी अधुरी कहानी’ या पुढील सिनेमाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, मोहीतने या सिनेमातील विद्या बालनचा पत्ता कट केला असल्याचे वृत्त होते. यामागे विद्याचे ‘बॉबी जासूस’मधील अपयश हे प्रमुख कारण सांगितले जात होते.

निर्माता महेश भट्ट यांनी मात्र या वृत्तामध्ये काही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. विद्याशिवाय हा सिनेमा पूर्ण होऊ शकत नसल्याचे भट्टनी स्पष्ट केले आहे. दिग्दर्शक मोहीत सुरीने सांगितले की, ‘मी कधीच अभिनेता पाहून सिनेमा बनवले नाहीत. त्यामुळे विद्याच्या मागील सिनेमाच्या अपयशाचा या सिनेमाशी काही संबंध नाही. विद्याचा अभिनय पाहून सिनेमात तिला संधी देण्यात आली आहे.’