मुंबई - बॉलिवूडची सुंदर आणि टॅलेंटेड अभिनेत्री आयशा टाकियाने गुरुवारी (10 एप्रिल) आपला 28 वा वाढदिवस साजरा केला. आयशा बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिचे कधीही वादासोबत नाते राहिलेले नाही.
मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात -
आयशाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग क्षेत्रातून केली होती. वयाच्या 15 व्या वर्षी ती 'आय एम ए कॉम्प्लान बॉय, आय एम ए कॉम्प्लान गर्ल' या प्रसिद्ध जाहिरातीत झळकली होती. त्यानंतर फाल्गुनीच्या मेरी चुनर उड उड जाए या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती.
2004मध्ये बॉलिवूडमध्ये एन्ट्री -
आयशाने 2004 मध्ये 'टार्जन द वंडर कार' या सिनेमाद्वारे आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. आपल्या या पहिल्याच सिनेमासाठी आयशाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता. 2004 यावर्षीच आयशाचा आणखी एक सिनेमा रिलीज झाला, तो म्हणजे दिल मांगे मोर. या सिनेमासाठी तिला स्क्रिन अवॉर्डमध्ये
प्रॉमिसिंग न्यूकमरचे नामांकन मिळाले होते.
सुरुवातीच्या दोन सिनेमांतील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणा-या आयशाचे नंतर आलेले सिनेमे मात्र फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. 'शादी नंबर वन', 'होम डिलीव्हरी' हे सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले.
'डोर' सिनेमातील भूमिकेचे विशेष कौतुक -
एकापाठोपाठ एक आलेल्या फ्लॉप सिनेमे आल्यानंतर 2006मध्ये आयशा डोर सिनेमात झळकली. या सिनेमातील तिने साकारलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले. या सिनेमासाठी तिला अनेक अवॉर्ड्स मिळाले. या सिनेमातील भूमिकेसाठी झी सिनेचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तिने आपल्या नावी केला.
2009मध्ये रिलीज झालेल्या 'वाँटेड' या सिनेमात आयशा अभिनेता सलमान खानसोबत झळकली होती. या सिनेमातील आयशाने साकारलेल्या भूमिकेचंही विशेष कौतुक झालं.
'सूरक्षेत्र' या सांगितिक रिअॅलिटी शोच्या सूत्रसंचालनाचीही जबाबदारी तिने सांभाळली होती.
23व्या वर्षी झाले लग्न -
आयशा टाकियाने वयाच्या 23व्या वर्षी लग्न केले. 2009मध्ये रेस्तराँचे मालक आणि समाजवादी पार्टीचे नते अबू आसिम आजमी यांचा मुलगा फरहान आजमीसोबत आयशाचे लग्न झाले. आयशाचे लग्न धूमधडाक्यात झाले होते. तिच्या लग्नात बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. आयशाच्या लग्नात सहभागी होणा-या सेलिब्रिटींमध्ये
शाहरुख खान, अभिषेक बच्चन, रोहित शेट्टी, सुनील शेट्टी, रोनित रॉय, राज बब्बर यांचा समावेश होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा आयशा टाकियाच्या लग्नाची खास छायाचित्रे...