आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY SPL: बघा इमरानचे Top Looks

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता आणि महेश भट्ट यांचा भाचा इमरान हाश्मी आज 35 वर्षाचा झाला आहे. हिंदी फिल्मी इंडस्ट्रीमध्ये अभिनेता म्हणून त्याने आपल्या करिअरच्या सुरूवातीपूर्वी एक सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. 2002मध्ये आलेला विक्रम भट्टच्या 'राज' सिनेमामध्ये त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. बॉलिवूडमध्ये त्याने 2003मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फुटपाथ' सिनेमामधून पदार्पण केले. परंतु त्याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. मात्र सिनेमाची गाणी लोकांनी डोक्यावर घेतली.
सुरूवातीच्या सिनेमांनी बनवले, 'सीरिअल किसर'
2004मध्ये इमरानचे दोन सिनेमे रिलीज झाले. त्यामधील पहिल्या 'मर्डर' सिनेमाने त्याच्या यशाचा आलेख उंचावला. त्यानंतर दुसरा 'तुमसा नही देखा' सिनेमा फ्लॉप झाला. त्याच्या सुरूवातीच्या सिनेमांमधील त्याच्या अभिनय आणि किसींग सीनमुळे त्याला 'सीरिअल किसर' म्हणून ओळखले जाऊ लागले. जेव्हा कधी इमरान मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखवण्यास येत तेव्हा मात्र त्याचा एकतरी किसींग सीन प्रक्षकांना बघायला मिळत. त्याने रुपेरी पडद्यावर अनेक अभिनेत्रींना किस केले आहे.
'द डर्टी पिक्चर'पासून बनला गंभीर अभिनेता
सीरिअल किसरचा शिक्का पूसण्यासाठी इमरानने अनेक अभिनयाच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्याने 'द डर्टी पिक्चर'मध्ये एक गंभीर भूमिका साकारून त्याचा प्रयत्न पूर्ण केला. त्यानंतर त्याने किसींग सीन देणे कमी केले. विशेष म्हणजे 2013मध्ये आलेल्या घनचक्कर सिनेमामध्ये त्याचा एकही किसींग सीन बघायला मिळाला नाही.
इमरानचे आगामी सिनेमे
उंगली (2014)
व्हाइट लाइज (2014)
शातिर (2014)
मि. एक्स (2015)
हमारी अधूरी कहाणी (2015)
बदतमीज दिल (2015)
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 35 वर्षांचा झालेल्या इमरान हाश्मीच्या बालपणीपासून ते आतापर्यंतची काही खास छायाचित्रे...