आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जया-अमिताभ यांचे लग्नापासून ते आत्तापर्यंतचे खास PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आणि अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन आज (9 एप्रिल) आपला 66वा वाढदिवस साजरा करत आहे. 1971मध्ये रिलीज झालेल्या गुड्डी या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या जया बच्चन बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री आहेत. जया यांना आपल्या पहिल्याच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
'गुड्डी'नंतर त्यांनी एकामागून एक अनेक सिनेमे केले. काही हिट ठरले तर काही फ्लॉप. या काळात त्यांनी 'उपहार' (1971), 'जवानी दीवानी' (1972), 'बावर्ची' (1972), 'परिचय' (1972), 'कोशिश' (1972) या सिनेमांसह अनेक सिनेमात अभिनय केला. 1972मध्ये आलेल्या 'कोशिश' या सिनेमानंतर ऋषिकेश मुखर्जी जयाचे आवडते दिग्दर्शक बनले. त्यानंतर जया यांनी ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित 'अभिमान' (1973), 'मिली' (1975) आणि 'चुपके चुपके' (1975) या सिनेमात काम केले.
'एक नजर'च्या दरम्यान जया आणि अमिताभ यांच्यात जुळले सुत-
1972मध्ये रिलीज झालेल्या 'एक नजर' या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान जया अमिताभ बच्चन यांना पसंत करु लागल्या होत्या.
अमिताभ बच्चन यांच्याशी पहिली भेट -
जया बच्चन जेव्हा पुण्यात शिक्षण घेत होत्या, तेव्हा अमिताभ बच्चन त्यांच्या 'सात हिंदुस्थानी' (1969) या सिनेमाच्या शुटिंगच्या निमित्ताने पुण्यात आले होते. जया त्यांना ओळखत होती. त्याकाळात जया आणि अमिताभ यांची पहिली भेट झाली होती.
अमिताभ यांच्यावर जडला जीव -
ऋषिकेश मुखर्जी यांनी 'गुड्डी' या सिनेमासाठी अमिताभ बच्चन आणि जया यांना कास्ट केले होते. मात्र काही कारणास्तव अमिताभ यांना या सिनेमातून बाहेर करण्यात आले. फिल्म इंडस्ट्रीतील जाणकार सांगतात, की या घटनेनंतर जया यांच्या मनात अमिताभ यांच्याविषयी प्रेम निर्माण झाले होते.
साध्या पद्धतीने झाले लग्न -
1973 मध्ये अमिताभ बच्चन आणि जया अभिमान या सिनेमात एकत्र झळकले होते. या सिनेमाचे शुटिंग सुरु असतानाच्या काळात या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. सांगितले जाते, की अमिताभ आणि जया या सिनेमाच्या शुटिंगनंतर सुटी घालवण्यासाठी परदेशात जाऊ इच्छित होते. मात्र अमिताभ यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी लग्न केल्याशिवाय बाहेर जायचे नाही, असा आदेश दिला. त्यानंतर अगदी साध्या समारंभात अमिताभ आणि जया लग्नगाठीत अडकले.
80च्या दशकात सिनेमात काम करणे केले कमी -
80च्या दशकात कौटुंबिक जबाबदा-या सांभाळण्यासाठी जया बच्चन यांनी काम कमी केले. 1981 मध्ये 'सिलसिला' हा सिनेमा केल्यानंतर त्या बॉलिवूडपासून दूर झाल्या. या सिनेमात जया यांच्यासह अमिताभ आणि रेखा झळकले होते.
17 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये केले कमबॅक -
1981 मध्ये सिलसिलानंतर बॉलिवूडपासून दूर गेलेल्या जया यांनी 1998मध्ये 'हजार चौरासी की मां' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. या सिनेमानंतर त्या ब-याच सिनेमात झळकल्या.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा जया आणि अमिताभ यांच्या लग्नपासून ते आत्तापर्यंतची खास छायाचित्रे...