आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'Day: तायक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्टपासून ते 'गरम मसाला' गर्लपर्यंत, पाहा नीतूचे 20 Pix

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नीतू चंद्रा मार्शल आर्टचा सराव करताना...)
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल आणि मार्शल आर्टिस्ट नीतू चंद्रा आज 30 वर्षांची झाली आहे. 20 जून 1984 रोजी बिहारच्या पटना शहरात नीतूचा जन्म झाला. पटनातील नोट्रे डेम अकॅडमीतून नीतूने आपले शिक्षण पूर्ण केले. मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरला सुरुवात करणारी नीतू आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या आईला देते.
तायक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवणारी पहिली अभिनेत्री..
नीतू चंद्राला 2012 मध्ये सेकंड रँकचा ब्लॅक बेल्ट मिळाला होता. 1996 मध्ये तिने वर्ल्ड तायक्वांडो चॅम्पिअनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते आणि 1997 मध्ये ती ब्लॅक बेल्ट होल्डर ठरली. 2012 मध्ये सेकंड डिग्रीचा ब्लॅक बेल्ट तिला तायक्वांडोचे जनक असलेले ग्रॅण्ड मास्टर जिमी आर जगतियानी यांनी दिला होता. तायक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवणारी नीतू भारतातील पहिली अभिनेत्री आहे.
'गरम मसाला'द्वारे केली अभिनयाला सुरुवात...
2005 मध्ये दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या 'गरम मसाला' या सिनेमाद्वारे नीतूने अभिनय करिअरला सुरुवात केली होती. या सिनेमात नीतूने स्वीटी नावाच्या एअरहोस्टेस तरुणीची भूमिका साकारली होती. या सिनेमात तिला अक्षय कुमार, जॉन अब्राहम आणि परेश रावल या दिग्गज कलाकारांसह काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर 2006मध्ये गोदावरी या तेलगू सिनेमात तिने मुख्य भूमिका साकारली होती. बॉलिवूडमध्ये 'गरम मसाला' या सिनेमासह 'ट्रॅफिक सिग्नल' (2007), 'वन टू थ्री' (2008), '13B' (2009), 'रण' (2010), 'अपार्टमेंट' (2010) आणि 'नो प्रॉब्लम' (2010) या सिनेमात नीतू झळकली आहे. अभिनेत्रीसोबतच नीतू निर्मातीसुद्धा आहे. 2013 देसवा या भोजपूरी सिनेमाची निर्मिती नीतूने केली होती. या सिनेमाचा दिग्दर्शक तिचा भाऊ होता.
रणदीप हुड्डासोबत होते अफेअर...
काही वर्षांपूर्वी नीतू आणि रणदीप हुड्डा यांच्या अफेअरची चर्चा चांगलीच रंगली होती. या दोघांनी लग्नाचासुद्धा निर्णय घेतला होता. मात्र 2012 मध्ये या दोघांचे ब्रेकअप झाले. रणदीपच्या स्मोकिंगच्या सवयीमुळे कंटाळून नीतूने त्याच्यासोबतचे आपले नाते संपुष्टात आणले, असे म्हटले जाते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा नीतू चंद्राची खास छायाचित्रे. ही छायाचित्रे तिच्या फेसबूक अकाऊंटवरुन साभार घेण्यात आली आहेत...