(अभिनेत्री तब्बू)
मुंबईः बॉलिवूडमध्ये गेल्या तीन दशकांपासून
आपल्या अभिनयाची जादू दाखवणा-या अभिनेत्री तब्बूने आज वयाची 43 वर्षे पूर्ण केली आहेत. 1980 मध्ये 'बाजार' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात करणा-या तब्बूचा प्रवास 'हैदर'पर्यंत येऊन पोहोचला आहे.
आपल्या फिल्मी करिअरमध्ये तब्बूने आत्तापर्यंत 80 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. हिंदीसोबतच तामिळ, तेलगू, मराठी, मल्याळम, बंगाली सिनेमांमध्ये तिचे दर्शन घडले आहे. इतकेच नाही तर हॉलिवूडमध्येसुद्धा तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. सिनेसृष्टीतील मोलाच्या योगदानाबद्दल भारत सरकारने तिला पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे.
तब्बूच्या खासगी आयुष्याविषयी तिच्या चाहत्यांना फारसे ठाऊक नाहीये. तब्बू प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी आणि बाबा आझमी यांची भाची आहे. याशिवाय ती 80-90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री फराह नाजची धाकटी बहीण आहे. 4 नोव्हेंबर 1971 रोजी हैदराबादमध्ये जन्मलेली तब्बू वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरसुद्धा अद्याप अ
विवाहित आहे.
तब्बूच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्यातील खास गोष्टी सांगत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या तब्बूविषयी बरेच काही..