आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरभजन सिंग करणार 'बिग बॉस-6'चे सूत्रसंचालन?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स वाहिनीवरील 'बिग बॉस' या रियालिटी शोचे पाचवे पर्व त्‍यातील स्‍पर्धकांमुळे, सलमान आणि संजय दत्‍त यांच्‍या सूत्रसंचालनामुळे खूप गाजले. पण, 'बिग बॉस'च्‍या सहाव्‍या पर्वाचे सूत्रसंचालन क्रिकेट खेळाडू हरभजन सिंग करणार असल्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.
'बिग बॉस'च्‍या आगामी पर्वात तू सहभागी होणार आहेस का असे विचारल्‍यावर हरभजन म्‍हणाला, 'या शोच्‍या निर्मात्‍यांनी मला 'बिग बॉस'च्‍या घरात सहभागी होण्‍याविषयी विचारले होते. पण मी त्‍या घरात तीन महिने राहूच शकणार नाही. त्‍यामुळे निर्मात्‍यांचा प्रस्‍ताव मी नाकारला.'
'बिग बॉस'च्‍या सहाव्‍या पर्वात स्‍पर्धक म्‍हणून नाही पण सूत्रसंचालक म्‍हणून सहभागी होणार आहेस का, असे विचारल्‍यावर तो आनंदात म्‍हणाला, 'मला या शोचे सूत्रसंचालन करायला नक्‍कीच आवडेल. त्‍यासंबंधी सध्‍या निर्मात्‍यांशी बोलणी सुरू आहेत.'
क्रिकेटच्‍या मैदानावर फिरकी गोलंदाजी टाकणारा हरभजन सूत्रसंचालन करताना स्‍पर्धकांना 'गुगली' टाकत आऊट करणार का ते पाहायचे.