आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरमनने बिपाशाच्या आईवडिलांसह घेतली डिनरची मजा, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेस्तराँच्या बाहेर पडताना हरमन बावेजा, बिपाशाचे आईवडील आणि बिपाशा बसू.
मुंबई - बॉलिवूड अभिनेता हरमन बावेजा अलीकडेच बिपाशा बसूच्या कुटुंबीयांसोबत एका खासगी डिनर पार्टीत सहभागी झाला होता. एका छायाचित्रामध्ये बिपाशा रेस्तराँमधून आपल्या आईसह बाहेर पडताना दिसत आहे, तर दुस-या छायाचित्रात हरमन बिपाशाच्या वडिलांसोबत गप्पा मारताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून हरमन आणि बिपाशा रिलेशनशिपमध्ये आहेत आणि या डिनर पार्टीनंतर हरमन आणि बिपाशाच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. या पार्टीत बिपाशाची बहीण विजयेता बसूसुद्धा सहभागी झाली होती.
हरमनने एका मुलाखतीत बिपाशासोबतच्या रिलेशनशिपची कबूली दिली होती. तर बिपाशाने सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केले होते. यापूर्वी बिपाशा अभिनेता जॉन अब्राहमसोबत रिलेशनशिपमध्ये होती, तर हरमन प्रियांका चोप्राला डेट करत होता. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरमन आणि बिपाशा आपल्या नात्याचे रुपांतर लवकरच लग्नात करु इच्छितात.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा खासगी डिनर पार्टीनंतर रेस्तराँमधून बाहेर पडताना बिपाशा, हरमन आणि बिपाशाच्या आईवडीलांची छायाचित्रे...