आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: \'हवा हवाई\'च्या स्क्रिनिंगला अदिती, एकतासह पोहोचले बरेच स्टार्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिग्दर्शक आणि अभिनेते अमोल गुप्ते यांचा 'हवा हवाई' हा आगामी सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजे 9 मे रोजी रिलीज होतोय. बॉक्स ऑफिसवर सिनेमाला यश मिळावे, यासाठी सिनेमाची स्टारकास्ट जोरदार प्रमोशन करत आहे. अमोल यांनी याच निमित्ताने मुंबईत सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते. या सिनेमाचे अमोल निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक आहेत.
सिनेमाच्या स्क्रिनिंगला जावेद अख्तर पत्नी शबाना आझमीसह पोहोचले होते. याशिवाय अभिनेत्री हुमा कुरैशी आपल्या आईवडिलांसह येथे दिसली. राज कुमार राव, अदिती राव हैदरी, निर्माती एकता कपूर, साकिब सलीम, पार्थो गुप्ते, मुश्ताक शेख, निर्माता रमेश तौरानी आणि त्यांची पत्नी, महेश भट्ट यांची मुलगी साक्षी भट्ट, पत्रलेखा, पुनीत मल्होत्रा, सुधीर मिश्रा, मारिया वारसी, डब्बू रत्नानीसह बरेच सेलेब्स हा सिनेमा पाहायला पोहोचले होते.
या सिनेमात साकिब सलीम आणि पार्थो गुप्ते मेन लीडमध्ये आहेत. पोर्थो अमोल गुप्ते यांचा मुलगा आहे. तर साकिब अभिनेत्री हुमाचा भाऊ आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'हवा हवाई'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची खास छायाचित्रे...