आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेलन बिपाशाला देणार नृत्‍यासाठी खास टिप्‍स

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी चित्रपटसृष्‍टीतील प्रसिद्ध नृत्‍यांगना हेलन 'जोडी ब्रेकर्स' या चित्रपटासाठी बिपाशा बसूला नृत्‍यासंबंधी खास टिप्‍स देणार आहेत. स्‍वत: हेलन नृत्‍य शिकवणार या कल्‍पनेनेच बिपाशाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
या चित्रपटात हेलन अभिनयही करणार आहेत. पण, चित्रपटातील आयटम सॉंगसाठी बिपाशाने हेलन यांचे मार्गदर्शन घ्‍यावे असे निर्मात्‍यांना सुचवले. त्‍यानुसार, निर्मात्‍यांनी हेलन यांना विनंती केली. त्‍यांनीही ही विनंती आनंदाने मान्‍य केली.
बिपाशा हेलन यांना तिचा आदर्श मानते. तसेच, हेलनसारखेच चिरतरूण आयुष्‍य लाभावे अशी बिपाशाची इच्‍छा आहे.