आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार अपील नसल्याने रिजेक्ट झाल्या होत्या हेमा, पाहा पर्सनल LIFE PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- हेमा मालिनी पूर्वी, दुस-या छायाचित्रात धाकटी मुलगी अहानासोबत हेमा)
हेमा मालिनी स्वत: मानतात, की त्यांच्या आईने कधीच त्यांना सुंदर म्हटले नाही. सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयाच्या बळावर एकेकाळी रुपेरी पडदा गाजवणा-या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या हेमा आजही सुंदर आणि तरुण दिसतात. 1968मध्ये जेव्हा एका दाक्षिणात्य तरुणीने बॉलिवूडमध्ये एंट्री केली तेव्हा कुणी विचारदेखील केला नसेल, की कधीकधी ही बॉलिवूडची सुपरस्टार होऊ शकते. 16 ऑक्टोबर रोजी हेमा मालिनी 66वा वाढदिवस साजरा करत आहे.
हेमा यांची आई जया चक्रवर्ती सिनेमा निर्मात्या होत्या. घरात फिल्मी वातावरण असल्याने त्यांनीही सिनेमाकडे कल दाखवला. बालपणी हेमा यांना अभ्यास करण्यात काहीच रुची नव्हती. परंतु इतिहास त्यांना आवडता विषय होता.
1963मध्ये एका तामिळ सिनेमामध्ये त्यांनी छोटासा परफॉर्मन्स दिला होता. 15 वर्षांच्या झाल्यानंतर त्यांनी एक तामिळ सिनेमासुध्दा साइन केला होता. परंतु स्टार अपील झाले नसल्याने तिला सिनेमातून काढून तिच्या ऐवजी अभिनेत्री जयललिता यांना घेण्यात आले होते.
राज कपूर यांच्यासोबत केली बॉलिवूडमध्ये एंट्री
1968मध्ये राज कपूर यांच्यासोबत 'सपनो के सौदागर' सिनेमातून हेमा यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. हा सिनेमा फ्लॉप ठरला. मात्र हेमा यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. हेमा यांना 1971मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जॉनी मेरा नाम' सिनेमातून तिला पहिले यश मिळाले. त्यानंतर तिने 1976पर्यंत अंदाज, लाल पत्थर, सीता आणि गीता, अमीर गरीब, प्रेम नगर सन्यासी, खुशबू शोले, चरस, महबूबसारखे अनेक ब्लॉकब्लस्टर सिनेमे दिले.
धर्मेंद्र यांच्यासोबत जमली रिल आणि रिअल लाइफ जोडी
1977मध्ये आलेल्या 'ड्रीमगर्ल' सिनेमाने हेमा यांना ड्रीमगर्ल नाव दिले. या सिनेमात त्यांचा को-स्टार धर्मेंद्र होते. 1970मध्ये 'मै हसीन तुम जवा'च्या शूटिंगदरम्यानद दोघांची जवळीक वाढली होती. परंतु धर्मेंद्र विविहित असल्याने हेमा यांनी त्यांच्यापासून दूरावा ठेवला होता. 'शोले'च्या मेकिंगदरम्यान हेमा-धर्मेंद्र जास्त जवळ आले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 1980मध्ये धर्मेंद्र-हेमा यांनी लग्न केले. दोघांना अहाना आणि ईशा दोन मुली आहेत.
लग्नानंतर केले अनेक सिनेमे
1980मध्ये धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केल्यानंतर त्यांनी सिनेमात काम करणे सुरुच ठेवले. ‘क्रांती’, ’नसीब’, ’सत्ते पे सत्ता’, ’सम्राट’, ’रजिया सुल्तान’सारखे सिनेमे हेमा यांनी लग्न झाल्यानंतर केले. 1990पर्यंत हेमा ‘जमाई राजा’सारखे मॅच्युअर पात्र साकारताना दिसल्या.
बागबानमधून केले पुनरागमन
दिर्घकाळ ब्रेक घेतल्यानंतर हेमा यांनी 2003मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'बागबान' सिनेमातून यशस्वी पुनरागमन केले. त्यानंतर त्यांनी ‘वीर-जारा’, ’बाबुल’, ‘सदिया’, ’बुड्ढा होगा तेरा बाप’सारखे सिनेमे दिले.
मल्टीटास्कर राहिल्या हेमा
अभिनयासोबत हेमा एक ट्रेंड क्लासिकल डान्सरसुध्दा आहे. त्यांनी अनेक सिनेमा आणि टीव्ही शोसुध्दा दिग्दर्शित केले आहेत. सिनेमांमधून ब्रेक घेतल्यानंतर 2003मध्ये हेमा यांची राज्यसभा सदस्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. 2004मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. सध्या हेमा मथुराच्या खासदार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हेमा मालिनी यांच्या LIFEची निवडक छायाचित्रे...