आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हरामजादे', '...पिल्ला'सह आता अनेक शब्दांवर चालणार सेन्सॉरची कात्री, अपशब्द केले Banned

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हिंदी सिनेमातील बॅन करण्यात आलेले शब्द)
'हरामजादे', 'हराम का पिल्ला', 'कुत्ते कमीने मै तेरा खून पी जाऊंगा' हे हिंदी सिनेमातील गाजलेला शब्द आणि संवाद. मात्र आता प्रेक्षकांना हिंदी सिनेमांमध्ये हे शब्द ऐकता येणार नाहीत. कारण यांसह ब-याच शब्दांना सेन्सॉरने कात्री लावली आहे. इतकेच नाही तर द्वयर्थी संवादांवरही बंदी घालण्यात आली आहे. काही आगामी सिनेमांना सेन्सॉरने लावलेल्या कात्रीमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.
सेन्सॉरच्या या निर्णयामुळे वास्तववादी सिनेमे बनवणा‍ऱ्या दिग्दर्शकांची गोची झाल्याचे दिसून ‌येत आहे. आगामी 'एनएच 10' या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये भरपूर रक्तपात, महिलेचा बदला असं सगळं दिसतंय. आता या नव्या निर्णयामुळे सिनेमाची टीम सेन्सॉरच्या कचाट्यातून सुटण्यासाठी काय काय करता येईल, यावर विचार करत आहे.
इंग्रजीतील काही शिव्यांवरही सेन्सॉरने बंदी घातली आहे. सेन्सॉरच्या या निर्णयामुळे सोशल नेटवर्किंग साइट्सवर तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. निर्माता-दिग्दर्शक महेश भट म्हणाले, 'सीबीएफसी हवे ते करू शकतात. पण त्यामुळे ते आमच्या विचारस्वातंत्र्याला कधीच आळा घालू शकत नाही.'
पुढील स्लाईड्समध्ये पाहा इंग्रजीतील कोणकोणत्या शब्दांवर बंदी घालण्यात आलेली आहे. सोबतच पाहा यासंदर्भात निर्माते अशोक पंडीत यांनी ट्विटरवर काय म्हटले आहे...