आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Here Is What Sanjay Dutt Wrote To Priya Dutt On Losing Election

तुरूंगातून संजयने बहिणीला लिहीले पत्र, पराभवानंतर वाढवले मनोबल!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा मुन्ना भाई अर्थातच संजय दत्त सध्या तुरूंगात आहे. तो 1993मध्ये मुंबई बॉम्ब स्फोटाप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत आहे. परंतु तुरूंगामध्ये असला तरी आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कात राहतो. संजने अलीकडेच, बहीण प्रिया दत्तला एक पत्र पाठवले आहे. प्रिया दत्तला लोकसभा निवडणूकीत पराभवाचा सामना करावा तेव्हा त्याने तिचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे पत्र लिहीले.
संजयने लोकसभा निवडणूकीपूर्वी प्रियाला निडवणूक लढण्यासाठी शुभेच्छा देणारे पत्र लिहीले होते. प्रिया मुंबईच्या उत्तर मध्यची सांसद सदस्य होती. यावेळीसुध्दा तिने याच जागेवरून निवडणूक लढवली. परंतु यावेळी ती निवडणूक जिंकण्यास अपयशी ठरली. भाजपाची उमेदवार पूनम महाजनने 1 लाख 86 हजार मतांनी तिचा पराभव केला. प्रियाच्या पराभवाची बातमी कळताच संजने पुन्हा तिला आत्मविश्वास वाढवण्यासाठी पत्र लिहीले.
सुत्रांच्या सांगण्यानुसार, संजयने या पत्रात प्रियाला लोकांची सेवा करण्याचा आणि हिम्मन न हारण्याचा सल्ला दिला. संजयने पत्रात लिहीले, की चांगल्या कामासाठी ती नेहमीच पुढे राहिलेली आहे. तुरूंगात वर्तमानपत्र वाचल्यानंतर संजयला प्रियाच्या पराभवाची बातमी कळाली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयला खूप दु:ख झाले. परंतु बहिणीचे मनोबल त्याने पत्र लिहून वाढवले. दोन्ही बहीण-भाऊ चांगल्या-वाईट क्षणांमध्ये नेहमीच एकमेकांची सवली बनून उभे राहिले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा संजयसह प्रियाची काही छायाचित्रे...