'पीके'मध्ये आमिर खानचे विविध लूक
मुंबई: आमिर खान त्याच्या आगामी सिनेमाविषयी खूप कनफ्यूज आहे. 'धूम 3'च्या यशानंतर आमिर खानला एका चांगल्या सिनेमाच्या पटकथेची प्रतिक्षा आहे, जेणेकरून त्याला त्यासाठी होकार देता यावा. आमिर त्याच्या सिनेमांविषयी खूप सतर्क असतो. त्याला सिनेमाची पटकथा आवडली नाही तर तो त्या सिनेमापासून स्वत:ला दूर ठेवतो.
एका जवळच्या सुत्राने सांगितले, की 'भूतनाथ रिटर्न्स'चे दिग्दर्शक नितीश तिवारीने आगामी सिनेमासाठी मिस्टर परफेक्शनिस्टला इम्प्रेस करण्याचा मोठा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही खास परिणाम झाला नाही. आमिरने तिवारीच्या काही पटकथा ऐकल्या आणि काही कल्पनासुध्दा त्याच्या पसंतीस पडल्या, मात्र तो कनफ्यूज आहे, की कोणत्या सिनेमाची निवड करावी. सध्या आमिर त्याच्या 'पीके' या आगामी सिनेमाला प्रमोट करण्यास बिझी आहे. हा सिनेमा ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज केला जाणार आहे. आमिर खान सिनेमाच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये स्वत:हून जोडला आहे. अशीही शक्यता वर्तवली जात आहे, की आमिर या सिनेमानंतरच तिवारीच्या सिनेमाशी जोडला जाऊ शकतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'पीके'च्या सेटवरून घेतलेली आमिरची काही छायाचित्रे...