आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'इंग्लिश विंग्लिश' जपानमध्ये प्रदर्शित होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गौरी शिंदेच्या दिग्दर्शनात तयार झालेला आणि श्रीदेवीचे पुनरागमन करणारा 'इंग्लिश विंग्लिश' हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता हाच चित्रपट 27 मे रोजी जपानमध्ये प्रदर्शित होत आहे. 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रूप की राणी चोरों का राजा'मध्ये श्रीदेवीने पारंपरिक जपानी महिलांचा 'किमोनो' पोशाख घातला होता. आता 'इंग्लिश विंग्लिश'च्या प्रदर्शनादरम्यान या फुटेजचा वापर इरॉस इंटरनॅशनल करणार आहे.
श्रीदेवीचे पती आणि 'रूप की..' चे निर्माते बोनी कपूर यांनी यास होकार दिला आहे. श्रीदेवी 'इंग्लिश विंग्लिश' चित्रपटाला अधिक लोकप्रियता मिळाल्याने खुश आहे. आतापर्यंत हा चित्रपट जर्मनी, हाँगकाँग, तैवानमध्ये प्रदर्शित झाला आहे.