आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindi Films Haider, Tewar, Bang Bang,Merry Kom Will Released In Same Day

‘मेरी कॉम’, ‘हैदर’, ‘तेवर’, ‘बँग बँग’: चार चित्रपटांचा वॉर, नुकसान निश्चित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार मोठ्या चित्रपट स्टुडिओंच्या जिद्दीमुळे 2 ऑक्टोबरला बॉक्स ऑफिसचे गणित बिघडण्याची चिन्हे आहेत. सध्या 'बॅँग बॅँग', 'मेरी कोम', 'हैदर' आणि 'तेवर' हे चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित करण्याची तयारी चालू आहे. मात्र, देशातील चित्रपटगृहांत आणि मल्टिप्लेक्समध्ये एकत्रितपणे चार चित्रपट प्रदर्शित करण्याची क्षमता नाही.
फॉक्स स्टार स्टुडिओ 'बॅँग बॅँग', व्हायाकॉम 18 'मेरी कोम', डिस्ने/युटीव्ही 'हैदर' आणि इरोस इंटरनॅशनल 'तेवर' चित्रपटांना एकाच दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबरला प्रदर्शित करण्याची तयारी करत आहेत. म्हणजे हृतिक रोशन, कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा, शाहिद कपूर, सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूर हे चाहत्यांमध्ये आपल्या चित्रपटाची निवड करण्याचा प्रचार करताना दिसतील. या वर्षी लोकसभा निवडणूक आणि आयपीएलमुळे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तारखांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
वर्षाच्या शेवटच्या मोठया वीकेंडसाठी आता संघर्ष सुरू झाला असून यामध्ये प्रत्येक स्टुडिओ पाच दिवसांचा मिळणारा फायदा लक्षात घेऊन आपला चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तांत्रिकदृष्ट्या आपल्या चित्रपटगृहांची 4 मोठय़ा स्टारकास्टचे चित्रपट एकत्र दाखवण्यासारखी स्थिती नाही. एका मल्टिप्लेक्समध्ये 3 ते 5 स्क्रीन असतील, तर प्रत्येक स्क्रीनवर कमीत कमी 5 शो झाले तरी 4 चित्रपटांना न्याय देणे शक्य नाही. 'बॅँग बॅँग' जर स्वतंत्रपणे प्रदर्शित झाला, तर या चित्रपटाला मल्टिप्लेक्समध्ये 15-20 शो रोज मिळतील. मात्र, 4 चित्रपट प्रदर्शित झाले, तर केवळ 6 शो चित्रपटाच्या वाट्याला येतील. अशाच प्रकारे 'मेरी कोम' चित्रपटाला 6 ऐवजी 2, 'हैदर' आणि 'तेवर' चित्रपटाला 8 च्या ऐवजी 3 शो मिळू शकतील. काही शहरांमध्ये चार चित्रपट लावू शकतील इतके सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे नाहीत. याचा सरळ साधा परिणाम म्हणजे कोणताच चित्रपट सुपरडुपर-बंपर हिट होणार नसून प्रमोशन स्लॉटिंगलादेखील अडचण येणार आहे. शिवाय प्रत्येक चित्रपटाच्या प्रचार खर्चात वाढ होणार आहे.
या चारमधून कोणताही स्टुडिओ 2 ऑक्टोबरची तारीख सोडण्यास तयार नाही. सूत्रांनुसार या चित्रपटातील काही कलाकार चर्चा करून मधला मार्ग काढण्याच्या विचारात आहेत.