आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hit And Run Case: Police Found All Missing Papers

हिट अँड रन प्रकरण: सलमानच्या खटल्यातील गहाळ कागदपत्रे सापडली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणातील गहाळ कागदपत्रे वांद्रे पोलिस ठाण्यात सापडली. या प्रकरणी २१ रोजी झालेल्या सुनावणीवेळी कागदपत्रे गहाळ झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. त्यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली होती. पुढील सुनावणी 12 सप्टेंबर रोजी आहे. दरम्यान, न्यायालयाचा दट्टा बसताच ही गहाळ झालेली कागदपत्रे वांद्रे पोलिस ठाण्याच्या कार्यालयात सापडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
काय आहे प्रकरण?
-2002 मध्ये सलमान खानच्या भरधाव गाडीने फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले होते. यात चौघे गंभीर जखमी झाले होते, तर एकाचा मृत्यू झाला होता. प्रत्यक्षदर्शींच्या जबाबानुसार सलमान ही गाडी चालवत होता. त्यामुळे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे.