आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिट अॅण्ड रन केसः पुन्हा सेशन कोर्टात हजर झाला सलमान, दोन साक्षीदारांनी साक्ष नोंदवली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुंबई सेशन कोर्टाच्या बाहेर अभिनेता सलमान खान)
मुंबई - 2002 च्या हिट अॅण्ड रन प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खानला आज पुन्हा एकदा सेशन कोर्टात हजर राहावे लागले. जेव्हा तो कोर्ट रुममध्ये आला तेव्हा त्याच्यासह त्याचा बॉडीगार्ड शेरा आणि बहीण अलविरा सोबत होते. यावेळी दोन साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली.
यापैकी एक साक्षीदाराचे नाव सचिन गंगा राम आहे तर दुसरा साक्षीदार मोहम्मद अब्दुल्लाह शेख आहे.
काय म्हटले सचिन गंगा रामने...
"मी अपघात होताना बघितला नव्हता. मी पोलिसांना एक गाडी बेकरीला जाऊन धडकली असे सांगितले होते. सलमानने अपघात केला, हे मी पोलिसांना सांगितले नाही. सलमानने अपघात केला हे लोकांनी मला सांगितले. माझ्यासोबत नूरुल्लाह जखमी झाला होता. त्याला अपघातानंतर रुग्णालयात पाठवण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला." - सचिन गंगा राम, कदम सिक्युरिटी गार्ड नील सागर हॉटेल
काय म्हटले मोहम्मद अब्दुल्लाह शेखने...
"मी A one बेकरीत काम करत होतो. जेव्हा अपघात घडला, तेव्हा मी झोपायला जात होतो. यादरम्यान एक जड वस्तू माझ्या पायाला येऊन धडकली आणि माझ्या उजव्या पायाला दुखापत झाली. मी मदतीसाठी ओरडलो. लोक म्हणत होते, की सलमान खानने अपघात केला आहे. मी बाहेर येऊन सलमानच्या गाडीला जवळून पाहिले. पांढ-या रंगाची गाडी होती. मी दीड महिना भाभा रुग्णालयात दाखल होतो. पोलिसांनी रुग्णालयातच माझी साक्ष घेतली. अपघातानंतर गाडी थोडी पुढे गेली. गाडीखाली फसलेल्या लोकांना बाहेर काढताना मी सलमानला पाहिले नाही. लोकांनी कार हलवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती हलली नाही. पोलिसांनी ती गाडी कधी तेथून हटवली ते मला ठाऊक नाही. मला अर्ध्या तासाने भाभामध्ये नेण्यात आले होते. गाडीजवळ 50 -60 लोकांची गर्दी जमा झाली होती. टॅक्सी चालक आणि बेकरीतील माणसे सलमानने अपघात केला, असे म्हणत असल्याचे मी पोलिसांना सांगितले." - मोहम्मद अब्दुल्लाह शेख
6 मे रोजी साक्षीदारांनी ओळखले होते सलमानला -
यापूर्वी मे महिन्यात तीन साक्षीदार मन्नू खान, कलीम शेख आणि मुस्लिम शेख यांनी सलमानची ओळख पटवली होती. सलमान यावेळी कोर्टात हजर होता. तेव्हा एका साक्षीदाराने साक्ष दिली होती, की अपघातावेळी सलमान मद्यधुंद होता. तो तेथे पडला. मात्र नंतर तेथून त्याने पळ काढला. तर दुस-या साक्षीदाराने साक्ष दिली होती, की त्याने सलमानला कारच्या ड्रायव्हिंग सीटहून बाहेर येताना पाहिले होते. तर सलमानच्या वकिलांच्या मते, तो त्यावेळी कार चालवत नव्हता.
काय आहे प्रकरण?
सलमानवर 2002मध्ये मुंबईतील वांद्रा हिल रोडजवळ फुटपाथवर झोपलेल्या पाच लोकांना आपल्या गाडीखाली चिरडण्याचा आरोप आहे. यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. तर चार जण गंभीर जखमी झाले होते.
पुढे पाहा मुंबई सेशन कोर्टाबाहेरची सलमानची छायाचित्रे...