आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिट अँड रन प्रकरण: साक्षीदार म्हणाला, 'ड्राइव्हिंग सीटवर सलमानच होता'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: सलमान खान)
मुंबई: 11 वर्षे जून्या 'हिट अँड रन' प्रकरणात आणखी एका साक्षीदाराने सलमानच्या विरोधात साक्ष दिली आहे. साक्षीदाराने कोर्टात सांगितले, की हॉटेलमधून बाहेर पडताना सलमान खान ड्राइव्हिंग सीटवर बसलेला होता.
'हिट अँड रन'चे प्रकरण 28 डिसेंबर 2002 रोजी घडले होते. या प्रकरणात सलमानवर वांद्राच्या हिल रोडच्या जवळील फुटपाथवर झोपलेल्या पाच लोकांना गाडीखाली चिरडल्याचा आरोप आहे. या प्रकरणात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि चारजण गंभीर जखमी झाले होते.