आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हाऊसफूल-2'चा व्हिडिओ झाला लीक, इंटरनेटवर धुमाकूळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साजिद खान दिग्‍दर्शित आगामी धमाल विनोदी चित्रपट 'हाऊसफूल-2'मधील एका गाण्‍याचा व्हिडिओ नुकताच लीक झालाय. चित्रपटातील 'पापा तो बँड बजाए' हे गाणे सध्‍या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात बघितले जात आहे.
काही दिवसांपूर्वीही 'हाऊसफूल-2'मधील एक गाणे लीक झाले होते. 2010मध्‍ये प्रदर्शित झालेला 'हाऊसफूल' सुपरहिट झाला होता. त्‍यातील मुख्‍य कलाकार अक्ष्‍ाय कुमार, रितेश देशमुख, रणधीर कपूर, बोमन इराणी आणि चंकी पांडे 'हाऊसफूल-2'मध्‍येही दिसणार आहेत.
त्‍यांच्‍याशिवाय चित्रपटात मिथून चक्रवर्ती, जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडिस, ऋषी कपूर, जरीन खान आणि श्रेयस तळपदे आदी कलाकार आहेत.
नुकत्‍याच लीक झालेल्‍या गाण्‍यात फराह खान नृत्‍य दिग्‍दर्शन करताना दिसत आहे. तसेच, या व्हिडिओत कलावंतासोबत दिग्‍दर्शक साजिद खान, निर्माता साजिद नाडीयावालाही नृत्‍य करताना दिसत आहेत.
तुम्‍हीही पाहा 'हाऊसफूल-2'मधील लीक झालेले हे गाणे: