मुंबई: बॉलिवूड स्टार्स अनेकदा लेटनाइट पार्ट्या करताना दिसतात. मात्र,
अक्षय कुमार या पार्ट्यांपासून दूर राहणेच पसंत करतो. फिटनेसची खास काळजी घेण्यासाठी ओळखला जाणारा अक्षय त्याच्या बर्थडेच्या दिवशीसुध्दा हा नियम तोडत नाही.
अक्षयच्या जवळच्या सूत्रांने सांगितले, 'अक्षय फिटनेसची खास काळजी घेतो. रोजप्रमाणे तो बर्थ डेच्या दिवशीसुध्दा 10:30 वाजता झोपला. पत्नी टि्वंकलने त्याला रात्री 12 वाजता केक कापण्यासाठी उठवले. पत्नी आणि मुलांसह त्याने केक कट केला आणि त्वरीत झोपायला निघून गेला.'
मध्यरात्री अक्षयला जेवढे मॅसेज आले त्यांचा रिप्लाय त्याने सकाळी दिला. अक्कीच्या एका मित्राने सांगितले, की मी त्याला रात्री 1 वाजता बर्थडे विश करण्यासाठी मॅसेज केला. मात्र मला त्याचा रिप्लाय सकाळी 4:25 वाजता मिळाला. अक्षय सकाळी 4 वाजता उठतो असे म्हटले जाते. त्यानंतर घराजवळ असलेल्या तो बीचवर जॉगिंगसाठीसुध्दा जातो.