आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How Priyanka Chopra\'s Looks Changed In The Last 14 Years

B’day: मिस वर्ल्डपासून ते ग्लॅमरस अभिनेत्रीपर्यंत पाहा किती बदलली \'देसी गर्ल\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: प्रियांका चोप्रा (पहिले छायाचित्रे मिस वर्ल्ड स्पर्धेदरम्यानचे आहे.)
प्रियांका चोप्रा बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये येते. ब्यूटी कॉन्टेस्ट जिंकल्यानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली. 18 जुलै 1982 रोजी जन्मलेली प्रियांका आज 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म जमशेदपूरमध्ये झाला. परंतु, बरेलीमध्ये अनेक वर्षे राहिल्याने ती या ठिकाणालाच आपले मुळगाव मानते.
प्रियांकाचे आई-वडील आर्मीमध्ये फिजीशियन होते. तिचे बालपण विविध शहरांतमध्ये (लखनऊ, पुणे, दिल्ली, बरेली, लडाख) गेले. 13 वर्षांची झाल्यानंतर प्रियांका यूएसला शिक्षणासाठी गेली. तिथे तिला अनेकदा वंशभेदाच्या टिकेला सामोरे जावे लागले. न्यूयॉर्कमध्ये राहत असताना तिने अनेक थिएटरमध्ये काम केले. पाश्चिमात्य, शास्त्रिय संगीत आणि कथक नृत्य शिकली.
इंजिनिअर होण्याचे स्वप्न होते
करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत प्रियांकाला सॉफ्टवेअर इंजिनिअर किंवा क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट बनायचे होते. यूएसहून भारतात परतल्यानंतर प्रियांकाने बरेलीत शिक्षण घेतले. तिथेच तिने एक लोकल ब्यूटी कॉन्टेस्ट जिंकली. तिच्या आईला जाणीव झाली, की प्रियांका या क्षेत्रात नाव कमावू शकते. प्रियांकाने मात्र या क्षेत्रात येण्याचा कधी विचारदेखील केला नव्हता. सांगितले जाते, की प्रियांकाच्या आईने तिचे तीन फोटो मिस इंडिया कॉन्टेस्टसाठी पाठवले होते. या फोटोंमध्ये प्रियांकाने सुट परिधान केला होता. तरीदेखील तिची निवड करण्यात आली.
मिस इंडियामध्ये मिळाले दुसरे स्थान
2000 मध्ये झालेल्या मिस इंडिया कॉन्टेस्टमध्ये प्रियांका फस्ट रनर अप होती. दिसायला साधी असली तरीदेखील प्रियांकाने शानदार प्रदर्शन करून विश्व सुंदरीचा किताब आपल्या नावी केला. 1 डिसेंबर 2000 रोजी लंडनमध्ये तिने मिस वर्ल्ड टायटलसुध्दा जिंकले.
14 वर्षांमध्ये बदलला लूक
आज दिवसते तेवढी सुंदर आणि ग्लॅमरस प्रियांका मिस वर्ल्ड झाल्यानंतर दिसत नव्हती. मागील 14 वर्षांत तिच्या लूकमध्ये खूप बदल झाला आहे. तिच्या लूकविषयी असेही सांगण्यात येते, की तिने आपल्या सौंदर्यात भर पडण्यासाठी नाकावर आणि ओठांवर शस्त्रक्रिया केली आहे.
बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींप्रमाणे प्रियांकानेसुध्दा याचा इन्कार केला आहे. परंतु जून्या आणि नवीन फोटोंकडे बघता तिच्या लूकमध्ये खूप बदल झाल्याचे जाणवते.
चला पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहूया अभिनेत्री प्रियांका चोप्राचे विविध लूक्स...