लाइट...कॅमेरा...अॅक्शन हे तिन्ही शब्द बॉलिवूड सेलेब्सला कधी-कधी कंटाळवाणे करणारे असतात. कारण या शब्दानंतर त्यांच्या शुटिंगचा काळ सुरू होतो. मग काय महिना महिना त्यात अडकून पडावे लागते. त्यामुळे काही दिवस यापासून दूर राहण्यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे 'आउटिंग'. सध्या शाळेच्या सुट्या सुरू आहेत. तसेच उन्हाळा असल्आने शुटिंगचे कामदेखील थोडे हळूवार गतीने चालू आहे. त्यामुळे स्टार्स ही वेळ फिरण्यासाठी चांगली संधी घेऊन आली आहे.
बॉलिवूडचेचे अनेक स्टार्स सध्या शॉर्ट ब्रेकवर आहेत. अभिषेक बच्चन पत्नी ऐश्वर्या मुलगी आराध्या आई जयासह लंडनमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहेत. यादरम्यान बहीण श्वेतासुध्दा त्यांच्यासह दिसली. बच्चन कुटुंबीय नेहमी सुट्यांसाठी वेळ काढतात. दुसरीकडे, हृतिक रोशनही आपली मुले रिहान आणि रिदानसह कॅलिफोर्नियामध्ये सुट्या घालवत आहे. तो मुलांसह डिज्नेलँडलासुध्दा गेला होता. त्याने मुलांसह फिरतानाची छायाचित्रे सोशल मिडियावर शेअर केली आहेत.
बॉलिवूडचे अनेक स्टार्स आणि कुटुंबीय आहेत ज्यांना सुट्या घालवण्यासाठी दूर परदेशी जाण्याची हौस असते. मग ते सैफ-करीना असो अथवा बोनी-श्रीदेवी, प्रत्येकाला सुट्यांचा पूर्ण आनंद लुटायचा असतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बी-टाऊनचे सेलेब्स सुट्यांचा आनंद कसा लुटतात...