मुंबई: हृतिक रोशन आणि कतरिना कैफ 'बँग बँग' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये अद्याप व्यस्तच आहेत. दोघे बुधवारी (1 ऑक्टोबर) रोजी एका इव्हेंटमध्ये सामील झाले होते. येथे त्यांनी 'बँग बँग'चे जोरदार प्रमोशन केले. या इव्हेंटचे आयोजन एका कोल्ड ड्रिंक कंपनीने केले होते, त्यामध्ये ते ‘#HeroesWanted’ (हिरो वान्टेड)ची मोहिम चालवत आहेत.
या इव्हेंटमध्ये कतरिना काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. तिचा ड्रेस खूपच स्टाइलिश दिसून आला. अनेक ठिकाणी कट असलेला ड्रेस duo Cushnie Et Ochsने डिझाइन केला होता. तसेच, हृतिक रोशनचा कॅज्युअल लूकमध्ये दिसला. तो जीन्स, टी-शर्ट आणि हाफ जॅकेट गेटअपमध्ये पोहोचला होता. इव्हेंटमध्ये कतरिनाने हृतिकसोबत मसल्स दाखवण्याची स्पर्धा केली. सोबतच, तिने हृतिकसोबत काही गंमतीशीर स्टेप्ससुध्दा केल्या. या इव्हेंटमधून त्यांना जे पैसे मिळाले त्यांनी ते जम्मू-काश्मिरमधील पिडीतांसाठी पंतप्रधान मदत निधीमध्ये देणार आहेत.
हृतिक-कतरिनाचा 'बँग बँग' रुपेरी पडद्यावर दाखल झाला आहे. हा सिनमा सिध्दार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच, फॉक्स स्टार स्टुडिओने निर्मित केला आहे. सिनेमाला विशाल-शेखरने संगीत दिले आहे. सिनेमामध्ये डॅनी डँग्जोप्पा आणि जावेद जाफरी यांनीसुध्दा काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बँग बँग'च्या प्रमोशनसाठी इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या हृतिक-कतरिनाची छायाचित्रे...