मुंबई - सिद्धार्थ मल्होत्राच्या 'बँग बँग'ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. 'बँग बँग' हा यावर्षी रिलीज होणारा मोस्ट अवेटेड सिनेमा आहे. निर्मात्यांनी या सिनेमात मेन लीड साकारणा-या हृतिक रोशन आणि
कतरिना कैफ यांच्या फोटोशूटचा फस्ट लूक रिलीज केला आहे.
हृतिक आणि कतरिनाने मुंबईतील जेडब्ल्यू मॅरिएटमध्ये फोटोशूट केले. फॉक्स स्टार स्टुडिओजच्या बॅनरमध्ये तयार होणारा 'बँग बँग' हा अॅक्शन थ्रिलर सिनेमा आहे. सिद्धार्थ राज आनंद हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. कॅमरुन डियाज आणि टॉम क्रूज यांच्या 'नाइट अँड डे' या हॉलिवूड सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. 'नाइट अँड डे' हा हॉलिवूडमधील ब्लॉकबस्टर सिनेमांपैकी एक आहे.
जून 2013 पासून 'बँग बँग' या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान 30 फूट उंचीवरुन उडी मारत असताना हृतिकला ब्रेन इंज्युरी झाली होती. काही महिन्यांपूर्वीच हृतिकची ब्रेन सर्जरी झाली आहे. त्यानंतर डॉक्टरांनी हृतिकला बेड रेस्टचा सल्ला दिला होता. त्यामुळे सिनेमाच्या शुटिंगला उशीर झाला.
'जिंदगी ना मिलेगी दोबारा'मध्ये एकत्र झळकले आहेत हृतिक-कतरिना
झोया अख्तरच्या 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या सिनेमात हृतिक आणि कतरिनाने एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. या सिनेमातील दोघांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली होती. या सिनेमात या दोघांसह फरहान अख्तर, अभय देओल आणि कल्कि कोचलिन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. याशिवाय हृतिकची प्रमुख भूमिका असलेल्या अग्निपथ या सिनेमात कतरिनाने एक आयटम नंबर केला होता. आता ही जोडी 'बँग बँग'मध्ये एकत्र झळकणार आहे. या सिनेमात दोघांवर इंटीमेट सीन्स चित्रीत करण्यात आले आहेत. यावर्षी 2 ऑक्टोबरला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'बँग बँग'च्या शूटमधून घेण्यात आलेली निवडक छायाचित्रे...