आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik And Team Celebrate Ashutosh Gowariker’S Birthday

PIX: हृतिकने दिग्दर्शकाला दिली सरप्राइज बर्थडे पार्टी, क्रू मेंबर्सही झाले सहभागी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(थिरकताना अभिनेता हृतिक रोशन आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर)

मुंबईः अभिनेता हृतिक रोशन सध्या आपल्या आगामी 'मोहनजोदडो' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. हा सिनेमा दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित करत आहेत.
15 फेब्रुवारी रोजी आशुतोष यांनी वयाची 51 वर्षे पूर्ण केली. यानिमित्ताने हृतिकसह सिनेमाच्या संपूर्ण टीमने त्यांचा वाढदिवस साजरा केला. आशुतोष यांच्यासाठी ही सरप्राइज बर्थडे पार्टी होती. या पार्टीत आशुतोष यांच्या पत्नीचीही विशेष उपस्थिती होती.
आशुतोष आणि हृतिकने यापूर्वी म्हणजे 2008मध्ये 'जोधा अकबर' या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र काम केले होते. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. आता या दोघांना आगामी 'मोहनजोदडो'कडून भरपूर अपेक्षा आहेत. या सिनेमात हृतिकसोबत पूजा हेगडे मेन लीडमध्ये आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा आशुतोष गोवारिकर यांच्या बर्थडे पार्टीची खास झलक...