(मुले हृहान (ब्लू टीशर्ट) आणि हृदानसोबत हृतिक रोशन)
मुंबईः हृतिक रोशन आणि
कतरिना कैफ स्टारर 'बँग बँग' हा सिनेमा आज थिएटरमध्ये दाखल झाला आहे. सिनेमाच्या रिलीजपूर्वी म्हणजे बुधवारी या सिनेमाचे एक स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसोबत हृतिकची दोन्ही मुले हृहान आणि हृदानसुद्धा सहभागी झाले होते.
स्क्रिनिंगमध्ये हृतिक कॅज्युअल लूकमध्ये दिसला. जीन्स, टी-शर्ट आणि हाफ जॅकेट त्याने परिधान केले होते. डोक्यावर कॅपसुद्धा होती. तर दुसरीकडे कतरिना कैफ ब्लॅक ड्रेसमध्ये स्क्रिनिंगला पोहोचली होती.
हृतिक आणि कतरिनासोबत अली जाफर, टायगर श्रॉफ, राकेश ओमप्रकाश मेहरा, डब्बू रत्नानी, होमी अदजानिया, अनाइता अदजानिया, आदिती राव हैदरी. अभिषेक कपूर, रमेश तौरानी, पुनीत मल्होत्रा, सूरवीन चावला, चंकी पांडेसह बरेच सेलेब्स बँग बँग सिनेमा बघायला पोहोचले होते.
'बँग बँग' हा सिनेमा सिद्धार्थ राज आनंद यांनी दिग्दर्शित केला असून फॉक्स स्टार स्टुडिओ निर्माते आहेत. विशाल-शेखर हे या सिनेमाचे संगीतकार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'बँग बँग'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलिब्रिटींची झलक...