आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik Roshan And Katrina Kaif's On Screen Chemistry In Bang Bang Song

Picsमध्ये पाहा 'बँग बँग'च्या टायटल साँगमधील हृतिक-कतरिनाची Love केमिस्ट्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बँग बँग'च्या टायटल साँगमध्ये हृतिक रोशन आणि कतरिना कैफ)
मुंबईः 'बँग बँग' हा अभिनेता हृतिक रोशनचा आगामी सिनेमा आहे. या सिनेमात कतरिना कैफ हृतिकसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. अलीकडेच या सिनेमातील तिसरे गाणे लाँच करण्यात आले असून हे टायटल साँग आहे. या गाण्यात हृतिक कतरिनासह बेभान होऊन थिरकताना दिसतोय.
हृतिक आणि कतरिनाची पडद्यावरची केमिस्ट्री यापूर्वीसुद्धा प्रेक्षकांनी बघितली आहे. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या सिनेमात त्यांनी एकत्र काम केले होते. त्यामुळे या टायटल साँगमध्ये त्यांची जुनी केमिस्ट्री बघायला मिळत आहे. या गाण्यात हृतिक मायकल जॅक्सनच्या अवतारात दिसत असून त्याने एमजे स्टाइलने डान्स केला आहे. कतरिनासुद्धा हृतिकच्या मागे नाहीये. तिच्या डान्सविषयी हृतिक म्हणाला होता, "मला कतरिनाची स्टाइल आणि जोश आवडला.''
'बँग बँग' हा सिनेमा फॉक्स स्टार स्टुडिओची निर्मिती आहे. विशाल शेखर या सिनेमाचे संगीतकार आहेत. एकुण 120 कोटींचे बजेट असलेला हा सिनेमा येत्या 2 ऑक्टोबर रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'बँग बँग'च्या टायटल साँगमधून घेण्याच आलेली छायाचित्रे आणि गाण्याचा व्हिडिओ...