आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik Roshan And Siddharth Anand Visited Divyamarathi Office

हृतिक म्हणतो, 'रणबीर, शाहिद, रणवीर माझ्यापेक्षा उत्कृष्ट डान्सर्स'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(हृतिक रोशन)

हृतिक रोशनचा बँग बँग या सिनेमाने पाच दिवसांत शंभर कोटी क्लबमध्ये मजल मारली आहे. गुरुवारी (2 ऑक्टोबर) बॉक्स ऑफिसवर दाखल झालेल्या या सिनेमाने सोमवारपर्यंत 107 कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. केवळ पाच दिवसांत शंभर कोटींची कमाई करणारा हृतिकचा 'बँग बँग' हा सिनेमा पाचव्या क्रमांकावर आहे.

या सिनेमाला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे हृतिकसोबत सिनेमाची संपूर्ण टीम भलतीच खुशीत आहे. आपला हा आनंद साजरा करण्यासाठी हृतिक सिनेमाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदसोबत divyamarathi.comच्या मुंबई ऑफिसला भेट दिली. यावेळी हृतिकने मनमोकळ्या गप्पा मारल्या.

यावेळी बोलताना हृतिक म्हणाला, ''या सिनेमाच्या निमित्ताने मी बराच बिझी होतो, आता सुटीवर जाण्याचे प्लान आहेत. पण ही सुटी कशी एन्जॉय करावी, याविषयी अद्याप काही विचार केलेला नाही. माझ्या दोन्ही मुलांना हा सिनेमा खूप आवडला. घरच्यांच्या चेह-यावरचा आनंद बघून समाधान मिळाले.''

आणखी काय म्हणाला हृतिक जाणून घ्या पुढील स्लाईडमध्ये...