मुंबईः बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान खान यांच्या घटस्फोटाला न्यायालयाने मान्यता दिली आहे. आज वांद्रे येथील कुटुंब न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान हृतिक आणि सुझान यांच्या घटस्फोटाला मंजूरी देण्यात आली. सामंजस्याने विभक्त होण्याच्या दोघांच्या निर्णयाला न्यायलयाने मान्यता दिली. खरं तर हृतिक-सुझानच्या घटस्फोटाची सुनावणी 31 ऑक्टोबर रोजी होणार होती. मात्र हृतिककडे वेळ नसल्याने सुनावणी 1 नोव्हेंबरवर ढकलण्यात आली.
हृतिक आणि सुझानला दोन मुले आहेत. दोन्ही मुलांचा ताबा कुणाकडे असेल, याबाबत अद्याप न्यायालयाने निर्णय दिलेला नाही.
हृतिक आणि सुझान यांच्यातील पोटगी आणि संपत्तीबाबात न्यायालयाने दिलेले आदेशाबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. काही दिवसांपूर्वी सुझानने हृतिककडे 400 कोटींची पोटगी मागितल्याची बातमी होती. मात्र नंतर दोघांनीही ही गोष्ट नाकारली होती.
हृतिक आणि सुझानचे लग्न 2000 मध्ये झाले होते. त्यांना दोन मुले असून हृहान आणि हृदान ही त्यांची नावे आहेत. डिसेंबर 2013 मध्ये हृतिक आणि सुझानने
आपले 14 वर्षांचे संबंध संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर आज न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. अशाप्रकारे आज बॉलिवूडमधील एका प्रेमकहाणीचा करूण अंत झाला आहे.
न्यायलयाबाहेर पडल्यानंतर हृतिक सुझानला तिच्या गाडीपर्यंत सोडायला गेला होता. पुढील स्लाईड्समध्ये पाहा न्यायालयाबाहेर पडतानाची हृतिक आणि सुझानची छायाचित्रे...