(हृतिक आणि सुझानची जुनी छायाचित्रे)
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान रोशन यांच्या घटस्फोटावर आज न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. घटस्फोटाची कायदेशीर कारवाई पूर्ण झाल्याने हृतिक-सुझानचे 14 वर्षांचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आले आहे. या दोघांना दोन मुलेसुद्धा आहेत. घटस्फोटानंतर दोन्ही मुलांची कस्टडी कुणाकडे असणार, यावर अद्याप निर्णय यायचा आहे.
रंजक गोष्ट म्हणजे हृतिक आणि सुझानचा प्रेम
विवाह होता. 'कहो ना प्यार है' या सिनेमामुळे एका रात्रीत स्टारडम मिळवणा-या हृतिकने 20 डिसेंबर 2000 या दिवशी सुझानसोबत लग्न केले होते. या दोघांना फिल्म इंडस्ट्रीतील रोमँटिक कपल म्हणून ओळखले जात होते.
आता हे दोघे नेहमीसाठी विभक्त झाले आहेत. मात्र जेव्हा हे दोघे एकत्र होते, तेव्हा त्यांचे नाते खूपच खास होते. सार्वजनिक ठिकाणी अनेकदा याची झलकसुद्धा बघायला मिळाली होती. हृतिक सुझानला पब्लिकली किस करतानासुद्धा दिसला होता.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जात असून हृतिक आणि सुझानचे काही खास रोमँटिक क्षणांची झलक दाखवत आहोत.