आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik Roshan And Shraddha Kapoor Attends 'Kill Dil' Screening

स्क्रिनिंगमध्ये जमली सेलेब्सची मांदियाळी, वाणी, श्रद्धाचा दिसला ग्लॅमरस अंदाज, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वाणी कपूर, श्रद्धा कपूर आणि अभिनेता विवेक ओबेरॉय)
मुंबईः रणवीर सिंह, परिणीती चोप्रा स्टारर 'किल दिल' हा सिनेमा शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. या सिनेमात या दोघांसह गोविंदा आणि अली जाफर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. शुक्रवारी या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला हृतिक रोशन, श्रद्धा कपूरसह सेलिब्रिटींची मांदियाळी जमली होती.
यावेळी अभिनेत्रींचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला. श्रद्धा कपूर व्हाइट गाऊनमध्ये दिसली. तिच्या हातात कॅमेरा होता आणि ती आपल्या सहकलाकारांचे फोटो क्लिक करत होती. तर वाणी कपूर शॉर्ट ड्रेसमध्ये आकर्षक दिसत होती. हृतिक रोशन ब्लू जीन्स, ग्रीन टी-शर्ट आणि ब्लॅक लेदर जॅकेटमध्ये दिसला.
स्क्रिनिंगला पूजा बेदी, कबीर खान, अर्जुन कपूर, आदिती राव हैदरी, आयुष्मान खुराना, चंकी पांडे, सोनू निगम, प्रज्ञा यादव, होमी अदजानिया यांच्यासह बरेच सेलिब्रिटी जमले होते.
'किल दिल'मध्ये व्हिलन साकारणारा अभिनेता गोविंदा पत्नी सुनीतासोबत स्क्रिनिंगला पोहोचला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'किल दिल'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...