आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik Roshan Celebrates Bang Bang Success With Divyamarathi.com

\'बँग बँग\'च्या यशाने हृतिक आनंदी, म्हणाला \'सिनेमाने करावी 2000 कोटींची कमाई\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद )

मुंबई- बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने मंगळवारी divyamrathi.comच्या मुंबई ऑफिसला भेट दिली. यावेळी त्याच्यासोबत सिनेमाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनीही हजेरी लावली होती. 2 ऑक्टोबर रोजी रिलीज झालेल्या 'बँग बँग' या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे.
चार दिवसांत या सिनेमाने भारत आणि ओव्हरसीजमध्ये एकुण 175 कोटींची कमाई केली आहे. बँग बँगला मिळालेल्या यशाचा आनंद हृतिकने आमच्यासोबत केक कापून साजरा केला. यावेळी त्याने व्हिडिओ कॉन्फ्ररसिंगच्या माध्यमातून आमच्या इतर सेंटर्सच्या प्रतिनिधींशी संवाद साधला...
सिनेमाच्या यशामुळे आनंदी...
हृतिक आणि सिद्धार्थ त्यांच्या सिनेमाला मिळालेल्या यशामुळे खूप आनंदी आहेत. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल असा विश्वास होता, असे यावेळी दोघांनी सांगितले. सिनेमा दोनशे कोटींच्या व्यवसायापर्यंत पोहोचला आहे, तुमचे टार्गेट काय? असे विचारल्यावर हृतिक म्हणाला, माझे टार्गेट हे आहे, की सिनेमा प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडावा आणि त्याने 100, 200 किंवा 300 कोटींचा नव्हे तर 2000 कोटींचा टप्पा गाठावा.
बँग बँग तयार करताना अनेक अडचणींचा करावा लागला सामना...
सिद्धार्थ आणि हृतिकने यावेळी सांगितले, की या सिनेमाच्या निर्मितीवेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागला. चित्रीकरणादरम्यान हृतिकच्या मेंदुला दुखापत झाली होती. शिवाय पत्नी सुझानपासूनसुद्धा तो विभक्त झाला होता. सिद्धार्थच्या पाठिंब्यामुळे सिनेमाचे शूटिंग पूर्ण करु शकलो, असे हृतिकने सांगितले.
थरारक स्टंट बघून घाबरली होती मुले...
थरारक स्टंट बघून मुले आणि आईवडिलांची काय प्रतिक्रिया होती? असा प्रश्न हृतिकला विचारला असता, तो म्हणाला, माझी दोन्ही मुले स्टंट बघून खूप घाबरली होती. मी असे काही स्टंट करतोय, हे मी त्यांना आधी सांगितले नव्हते. मात्र नंतर त्यांना सेफ्टीसोबत हे सर्व स्टंट केल्याचे त्यांना पटवून दिले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा हृतिक आणि सिद्धार्थची खास छायाचित्रे...