आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik Roshan Has Changed The Whole Shooting Schedul

सरावासाठी हृतिक ने‘तू मेरी’चे शेड्यूल बदलले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीजरनंतर समोर आलेल्या या गाण्याला हिट नंबरच्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. या गाण्यामध्ये हृतिकचा खास डान्स असून पार्टीचा हा डान्स ट्रेंड बनला गेला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या गाण्यासाठी हृतिकला सरावासाठी देखील वेळ देता सरळ शूटिंगची योजना आखण्यात आली होती. हृतिकला ज्यावेळी ही गोष्ट समजली त्यावेळी त्याने तत्काळ शेड्यूलमध्ये बदल केला होता.
हृतिकने याबाबत सांगितले की, ‘साधारणत: माझे नृत्यदिग्दर्शक मला सरावासाठी वेळ देत नाहीत. सर्वांना माझ्या डान्सवर अधिक विश्वास आहे. सरावाशिवाय तुमचे कोणतेही सादरीकरण अपूर्ण आहे, असे मला वाटते. त्यामुळे मी शेड्यूल बदलले आणि तीन दिवस गाण्याचा सराव केला. त्यानंतर चार दिवसांमध्ये हे गाणे शूट करण्यात आले.’ हृतिकला गुडघादुखीचा अनेक वर्षांपासून त्रास आहे. मात्र या गाण्यामध्ये अधिकतर डान्स हा एका पायावर आहे. मायकल जॅक्सनला आदर्श मानणाःया हृतिकचा या निमित्ताने एक नवा पैलू समोर आला आहे.