आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik Roshan Hits Katrina Kaif’S Face On The Sets Of \'Bang Bang\'

शूटिंगदरम्यान हृतिकचे कोपर लागल्यामुळे कतरिनाच्या गळ्यावर चढली सूज!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : 'बँग बँग'च्या शूटिंगदरम्यान कतरिना आणि हृतिक)
मुंबई - एका अॅक्शन सिक्वेन्सदरम्यान अभिनेत्री कतरिना कैफ जखमी झाली आहे. झालं असं, की कतरिना सध्या दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या आगामी 'बँग बँग' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.
1 जुलै रोजी मुंबईतील गोरेगाव स्टुडिओत या सिनेमातील अॅक्शन सीनचे शूटिंग सुरु होते. या सीनमध्ये हृतिकला कतरिनाचा बचाव करायचा होता. शूटिंगदरम्यान हृतिकच्या कोपरचा मार कतरिनाच्या गळ्याला लागला. या घटनेनंतर कतरिनाच्या गळ्याला सूज आली आणि शूटिंग दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कतरिना किरकोळ जखमी झाली होती. संध्याकाळपर्यंत तिच्या गळ्याला आलेली सूज कमी झाली.
'बँग बँग' हा अॅक्शन थ्रिलर सिनेमा असून यामध्ये हृतिक रोशन, कतरिना कैफ, बिपाशा बसू, डॅनी डेन्जोंगपा आणि जावेद जाफरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा यावर्षी गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजे 2 जून 2014 रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'बँग बँग'च्या शूटिंगदरम्यानची छायाचित्रे...