(हृतिक रोशनची गळाभेट घेताना दीपिका पदुकोण)
मुंबई -
अर्जुन कपूर आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फाइंडिंग फॅनी' हा सिनेमा येत्या 12 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. सिनेमाची रिलीज डेट जवळ आल्यामुळे प्रमोशनसाठी कलाकारांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. सोबतच सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंगसुद्धा ठेवली होती. या स्क्रिनिंगला हृतिक रोशन, करण जोहरसह बरेच सेलेब्स दिसले.
हृतिक रोशन सहसा स्क्रिनिंगला हजेरी लावणे टाळत असतो. मात्र 'फाइंडिंग फॅनी'च्या टीमला
आपल्या शुभेच्छा देण्यासाठी तो या स्क्रिनिंगला आवर्जुन हजर होता. यावेळी तो ब्लॅक टीशर्ट आणि ट्राउजरमध्ये दिसला. शिवाय नेहमीप्रमाणे त्याच्या डोक्यावर हॅट होती. दीपिकाने गळाभेट घेऊन हृतिकचे स्वागत केले.
दुसरीकडे निर्माता-दिग्दर्शक करण जोहरसुद्धा ब्लॅक आउटफिटमध्ये दिसला. इतकेच नाही तर दीपिका आणि अर्जुन कपूर यांनीदेखील ब्लॅक आउटफिटला पसंती दिली होती. स्क्रिनिंगला अर्जुनची धाकटी बहीण अंशुला कपूरसुद्धा पोहोचली होती.
हा सिनेमा होमी अदजानिया यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमातील डिंपल कपाडियाच्या काही सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवली आहे. या सिनेमात अभिनेता रणवीर सिंह देखील एका छोट्या भूमिकेत झळकला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'फाइंडिंग फॅनी'च्या स्पेशल स्क्रिनिंला पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...