आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Hrithik Roshan, Priyanka Chopra Attend Sonali Bendre\'s Party

सोनाली-गोल्डीच्या पार्टीत पोहोचले ऐश्वर्या-हृतिक-प्रियांका, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि दिग्दर्शक गोल्डी बहल यांनी शनिवारी आपल्या लग्नाचा 12वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने सोनालीने आपल्या घरी एका छोटेखानी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बी टाऊनमधील सोनालीच्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी हजेरी लावली होती.
पार्टीत सहभागी होणा-या सेलिब्रिटींमध्ये तब्बू, जेनेलिया आणि रितेश देशमुख, हृतिक रोशन, विक्टर आचार्य, अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन, प्रियांका चोप्रा यांचा समावेश होता.
सोनाली बेंद्रेने अलीकडेच अजीब दास्तां है ये या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. दिग्दर्शक गोल्डी बहलसोबत 2002मध्ये सोनाली लग्नगाठीत अडकली होती. या दोघांना एक मुलगा आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सेलेब्सची खास छायाचित्रे..