आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik Roshan, Siddharth Celebrates Bang Bang Success With Dainikbhaskar.Com

PICS: हृतिकने dainikbhaskar.com सोबत साजरे केले 'बँग बँग'चे यश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: हृतिक रोशन आणि सिद्धार्थ आनंद
मुंबईः बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने मंगळवारी dainikbhaskar.comच्या मुंबई ऑफिसला
भेट दिली. यावेळी त्याच्यासोबत बँग बँगचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हजर होते.यावेळी dainikbhaskar.comच्या मुंबई ऑफिसमध्ये 'बँग बँग'च्या यशाचा आनंद साजरा करण्यात आला.
गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या या सिनेमाने तिकिटबारीवर 175 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. सिनेमाला मिळत असलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे हृतिक आणि सिद्धार्थ आनंदीत आहेत. त्यांनी आपला हा आनंद केक कापून साजरा केला. यावेळी हृतिक म्हणाला, 'मी तुमच्या प्रेमासाठी आभारी आहे. सिनेमाचे यश साजरे करण्यासाठी मी कापत असलेला हा पहिलाच केक आहे.' (हृतिक म्हणतो, 'रणबीर, शाहिद, रणवीर माझ्यापेक्षा उत्कृष्ट डान्सर्स')
या सिनेमात हृतिकसोबत कतरिना कैफ मेन लीडमध्ये आहे. सिनेमात दोघांनीही थरारक स्टंट्स केले आहेत. हृतिकने आपला आनंद व्यक्त करताना म्हटले, 'सिनेमाने आणखी रेकॉर्ड प्रस्थापित करावे अशी माझी इच्छा आहे. मी माझ्या सर्व चाहत्यांचे आभार व्यक्त करतो. भविष्यातसुद्धा मला प्रेक्षकांचे असेच प्रेम मिळत राहिल, अशी मी आशा व्यक्त करतो.' ('बँग बँग'च्या यशाने हृतिक आनंदी, म्हणाला 'सिनेमाने करावी 2000 कोटींची कमाई')
पुढील स्लाईड्समध्ये पाहा केक कापतानाची हृतिक-सिद्धार्थची छायाचित्रे...