मुंबई: बॉलिवूडचा 'क्रिश' अर्थातच हृतिक रोशन शनिवारी लंडहून परताना दिसला (21 जून) मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर दिसला. यावेळी हृतिक खूपच वेगळ्या अंदाजात दिसला. त्याच्याकडे सध्या फावला वेळ असून तो 'बँग बँग' या आगामी सिनेमा रिलीज होण्याची प्रतिक्षा करत आहे.
हृतिक एअरपोर्टवर कूल लूकमध्ये दिसला. त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जॅकेट, ट्राऊजर आणि कॅनव्हास शू घातलेले होते. अनेक ठिकाण कॅप लूकमध्ये दिसणारा हृतिक यावेळी हॅटमध्ये दिसला. त्याने काळ्या-पांढ-या रंगाची हॅट घातलेली होती. डोळ्याला चश्मा त्याच्या कूल अंदाजाला शोभून दिसत होता.
हृतिकचा 'बँग बँग' सिनेमा येत्या 2 ऑक्टोंबर गांधी जयंतीच्या दिवशी रिलीज होणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन सिध्दार्थ आनंदने केले आहे. हृतिक रोशन व्यतिरिक्त सिनेमा
कतरिना कैफ, बिपाशा बसु आणि जावेद जाफरीने काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एअरपोर्टवर दिसलेल्या हृतिकचा कूल अंदाज...