आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिकने आपल्या दोन्ही मुलांसह बघितला सिनेमा, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[हृतिक रोशन मुलगा हृहान (रेड जॅकेट) आणि हृदानसह]
मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन आपल्या आगामी बँग बँग या सिनेमामध्ये बिझी आहे. त्याचा हा सिनेमा यावर्षी 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत हृतिक आपल्या दोन्ही मुलांसह सोमवारी रात्री सिनेमा बघायला मुंबईतील लाईटबॉक्स थिएटरमध्ये पोहोचला होता.
यावेळी हृतिक कॅज्युअल लूकमध्ये दिसला. त्याने जीन्ससोबत टी-शर्ट घातले होते. नेहमीप्रमाणे त्याच्या डोक्यावर कॅप होती. धाकटा मुलगा हृदान त्याच्या कडेवर होता. तर हृहान सोबत होता. आपल्या पप्पांप्रमाणे हृहान आणि हृदानसुद्धा कॅज्युअल लूकमध्ये दिसले.
हृतिक आणि त्याच्या मुलांसह लाईटबॉक्समध्ये सिनेमाची मजा अनुभवायला अभिनेत्री दीया मिर्झा तिच्या भावी पती साहिल सिंघासह पोहोचली होती. यावेळी अभिनेता कुणाल कपूरसुद्धा त्याची भावी पत्नी आणि अमिताभ बच्चन यांची पुतणी नैना बच्चनसह पोहोचला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे...