आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik Roshan Suzanne Roshan Latest News In Hindi

हृतिक झाला बेरोजगार, वडिलांपासून विभक्त होऊन सुरू करणार प्रॉडक्शन हाऊस!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हृतिक-सुझान यांनी डिसेंबर महिन्यात विभक्त होण्याची घोषणा केली होती. आता एकमेकांच्या सहमतीने घटस्फोटाचा अर्जदेखील त्यांनी दाखल केला आहे. या पूर्ण प्रक्रियेमध्ये सुझान जितकी खंबीर दिसत आहे, तेवढाच हृतिक उदास दिसतोय.

त्याचा 'बँग बँग' सिनेमा ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहे. त्यानंतर कोणताही मोठ्या बजेटचा सिनेमा त्याच्याकडे नाहीये. काका राजेश रोशन यांच्या एका सिनेमात तो केवळ पाहूण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. परंतु सुझान हृतिकच्या तुलनेत खंबीर दिसत असून स्वत:ची ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात लागली आहे. मैत्रीण सीमा खान आणि महीप कपूर यांच्यासोबत लाइफस्टाइल स्टोअर 'बांद्रा 190' लाँच केल्यापासून सुझानचा स्वतंत्र्य जगण्याकडे कल दिसून येतोय.
त्यानंतर गौरी खानसोबतसुध्दा ती इंटीरिअर डिझायनिंग प्रोजेक्ट सुरू करण्याच्या तयारीत आहे. ती सध्या इंटीरिअर संस्थेशीसुध्दा जोडलेली आहे. हृतिकपासूवन विभक्त होताच तिने हातावरील टॅटूसुध्दा बदलला आहे. तिच्या या वागण्याकडे बघता जाणवते, की ती आपल्या स्वतंत्र्य आयुष्याकडे वळत आहे.
पुढे वाचा, याविषयीची सविस्तर बातमी आणि हृतिकच्या काय योजना आहेत?