हृतिक रोशनने 'बँग बँग'मधील गाण्यांचे लाँचिंग करताना
आपल्या बरोबरीच्या नायकांची प्रशंसा केली. काही दिवसांपूर्वी आमिर खानने हृतिकचा एक डान्स व्हिडिओ
फेसबुकवर शेअर करत लिहिले होते की, 'मला हृतिकसारखा डान्स करता आला असता तर!'
याबाबत हृतिकनेदेखील एक पाऊल पुढे जात आमिरचे कौतुक करत म्हटले की, 'मी आमिरसारखे कपडे उतरवू शकलो असतो तर... ('
पीके' मधील न्यूड पोस्टरबाबत)' ऑक्टोबरमध्ये हृतिकच्या 'बँग बँग'सोबत शाहिद कपूरचा 'हैदर' रिलीज होत आहे. याबाबत त्याने सांगितले की, 'हे प्रथमच होईल जेव्हा, दोन्हीही चित्रपट
बॉक्स ऑफिसवर सोबतच इतिहास घडवतील.' या दोन्ही चित्रपटांना यंदाच्या वर्षातील सर्वांत मोठा वीकेंड मिळणार आहे. आता या वीकेंडमध्ये कोणता चित्रपट अधिक व्यवसाय करण्यात यशस्वी ठरतो, हे पाहावे लागणार आहे.