आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik Roshan Tribute To Michael Jackson In Bang Bang

मायकल जॅक्सनच्या अवतारात हृतिक, \'बँग बँग\'मध्ये दिसली झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बँग बँग'मधील गाण्यात मायकल जॅक्सनच्या रुपात हृतिक रोशन)
मुंबई: बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशनच्या 'बँग बँग' या आगामी सिनेमाची चाहत्यांना बरीच प्रतिक्षा आहे. सिनेमाचा टीजर आणि गाणी लोकांच्या पसंतीस पडत आहे. अशातच, हृतिकने मायकल जॅक्सन अवतारातील आणखी एक गाणे रिलीज केले आहे. हृतिक या गाण्यात एमजेच्या रुपात दिसत आहे.
सिनेमाचे टायटल साँग 'बँग बँग'चा टीजर रिलीज करण्यात आला. 15 सेकंदाचा हा टीजर असून त्यात हृतिक हटके लूकमध्ये दिसून येत आहे. या गाण्याची काही छायाचित्रे रिलीज करण्यात आली आहेत. त्यात हृतिक MJ स्टाइलमध्ये शर्टाची बटण ओपन करून डोक्यावर हॅट घातलेल्या लूकमध्ये दिसतोय. 'बँग बँग'चे दिग्दर्शन सिध्दार्थ राज आनंदने केले आहे. सिनेमात हृतिकच्या आपोजिट कतरिना कैफ दिसणरा आहे.
अलीकडेच, टायगर श्रॉफनेसुध्दा मायकल जॅक्सनच्या अवतारातील एक व्हिडिओ लाँच केला होता. या व्हिडिओमध्ये तो कोरिओग्राफर परेश शिरोडकरसोबत डान्स करत होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मायकल जॅक्सनच्या अवतारातील हृतिकची छायाचित्रे...