आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुझानपासून दूर दोन्ही मुलांसह वेळ घालवतोय हृतिक, पाहा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन या दिवसांत सिनेमांपासून ब्रेक घेत आपला संपूर्ण वेळ आपल्या दोन्ही मुलांसह घालवत आहे. पत्नी सुझानपासून विभक्त झालेला हृतिक काही दिवसांपूर्वीच आपल्या मुलांसह एक्स मॅनच्या स्क्रिनिंगला दिसला होता. त्यानंतर आता हृतिक रेहान आणि रिदानला घेऊन फॉरेन टूरला गेला आहे. सध्या हे तिघे डिस्नेलँडमध्ये भरपूर धमालमस्ती करत आहेत. हृतिकने डिस्नेलँडमधील एक छायाचित्र ट्विटरवर शेअर केले आहे. या छायाचित्रात तिघेही जीन्स आणि टी-शर्टमध्ये दिसत आहेत.
हृतिकने छायाचित्रासह ट्विट केले, अज्ञात रस्त्यावरुन प्रवास करताना थोडा वेळ थांबून एक छायाचित्र घ्यायला हवे.
हृतिक आणि त्याची पत्नी सुझानने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात आपले 17 वर्षे जुने नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. आपल्या मुलांसह जास्तीत जास्त वेळ घालवून कदाचित हृतिक सुझानपासून विभक्त होण्याचे दुःख विसरण्याचा प्रयत्न करत असावा.
पुढील स्लाईड्सवर कल्कि करा आणि पाहा मुलांसोबतची हृतिकची छायाचित्रे...