(फाइल फोटो- अभिनेता हृतिक रोशन)
मुंबई - फिल्म इंडस्ट्रीत अभिनेता हृतिक रोशनची बॉडी नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. त्याच्या पिळदार शरीरयष्ठीने अनेकांना भूरळ घातली आहे. बॉडीत तो अव्वल आहे. मात्र आगामी सिनेमासाठी अव्वल असणे पुरेसे नाहीये. आगामी 'मोहनजोदडो' या सिनेमासाठी हृतिकला त्याच्या शरीरात अनेक बदल घडवून आणायचे आहेत. याच कारणामुळे त्याने या सिनेमाची निर्माती आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांची पत्नी सुनीता गोवारिकर यांच्याकडे विनंती केली आहे, की जॉशुआ काइल बेकर यांची त्याच्यासाठी नियुक्ती करण्यात यावी. जॉशुआ लंडनस्थित पर्सनल ट्रेनर आणि क्रॉसफिट कोच आहेत.
आपल्या मागील सिनेमांसाठीही हृतिकने आपल्या बॉडीवर विशेष मेहनत घेतली आहे. 'धूम 2'साठी त्याने ऐट पॅक अॅब्स बनवले होते. 'गुजारिश'साठी काही किलो वजन वाढवले होते. 'क्रिश 3'साठी ब्रिटनचे सेलिब्रिटी बॉडीबिल्डिंग एक्सपर्ट क्रिस गेथिन यांची मदत घेतली होती. क्रिस आणि जॉशुआ यांच्याविषयी स्वतः हृतिकने माहिती गोळा केली. आता हृतिकने आपल्या आगामी 'मोहनजोदडो' या सिनेमातील आपल्या भूमिकेसाठी विशेष रिसर्च केला आणि जॉशुआ यांच्याकडून फिटनेसचे धडे घेण्याचे ठरवले आहे.
सिनेमाशी निगडीत एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हृतिक सिनेमात मसक्यूलर दिसायला नकोय. यासाठी जॉशुआ त्याची मदत करणार आहेत. यावर्षी ऑगस्ट महिन्यात हृतिकने जॉशुआ यांना लंडनहून तीन महिन्यांचे ट्रेनिंग देण्यासाठी मुंबईत बोलावले आहे. त्यानंतर हृतिक सिनेमाचे शूटिंग सुरु करणार आहे.
जॉशुआ लंडन येथील रहिवाशी असून शरीराचा कायापालट करण्यासाठी त्यांना ओळखले जाते. ते ट्रान्सफॉरमेशनल फिटनेस आणि बॉडीबिल्डिंग फिटनेस मॉडेलिंगचे कोच आहेत.