आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hrithik Routed Brain Surgery Without Being Unconscious

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हृतिकने बेशुध्द न होता करून घेतली होती ब्रेन सर्जरी, मुलाखतीत उलगडले रहस्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- हृतिक रोशन)
मुंबई: हृतिक रोशनने 'बँग बँग' या आगामी सिनेमाच्या शूटिंगपूर्वी ब्रेन सर्जरी केली होती. अलीकडेच, 'बँग बँग'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये हृतिकशी बातचीत करण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्याने काही गोष्टी सांगितल्या. हृतिकच्या सांगण्यानुसार, 'बँग बँगच्या शूटिंगवर जाण्यापूर्वी तो जेव्हा ट्रेड मील मशीनवर चालत होता, तेव्हा त्याला जाणवले, की त्याला चक्कर येत आहे. हात-पाय आपोआप थरथरायला लागले होते. त्यानंतर त्वरीत त्याने डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी त्याला ताबडतोब ब्रेन सर्जरी करण्यास सांगितले.'
त्याने तीन विविध डॉक्टरांशी बातचीत केली, सर्वांनी एकसारखाच सल्ला दिला. ज्या डॉक्टरांनी हृतिकला सल्ला दिला होता त्याच डॉक्टरांकडून सर्जरी केली. हृतिकने सांगितले, की सर्जरी चालू असताना तो बेशुध्द नव्हता. त्याला सर्जरीमधील सर्व हालचाली कळत होत्या. तो भिती कमी करण्यासाठी गाणे गुनगुनत होता. परंतु डोक्यातून वाहणारे रक्त पाहून त्याची बोलती बंद झाली होती.
हृतिकने सांगितले, ब्रेन सर्जरी बेशुध्द होऊन करू नये. कारण आपल्या हात-पायांची हालचाल आपल्याला कळत नाही. मेंदू व्यवस्थित काम करत नसेल तर आपल्याला ते जाणवते. त्यामुळे हृतिकने ब्रेन सर्जरी बेशुध्द न होता केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा कतरिनाने यावेळी काय-काय सांगितले...