('बँग बँग'चे पोस्टर)
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, हृतिक रोशन आणि
कतरिना कैफ अभिनीत 'बँग बँग'हा अॅक्शन सिनेमा उद्या म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे. या सिनेमाने प्रदर्शनाआधीच इतिहास रचला आहे. ‘बँग बँग’ बॉलिवूडमधला आत्तापर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमाचे बजेट जवळपास 140 कोटींचे आहे. यामध्ये प्रमोशन आणि जाहिरातीच्या खर्चाचाही समावेश आहे.
या सिनेमाचा दुसरा अॅक्शन ट्रेलर लाँच झाल्यानंतर प्रेक्षक 'बँग बँग'कडे आकर्षित झाले आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या तिकिटाची अॅडव्हान्स बुकिंग करणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसते आहे. फॉक्स स्टार स्टुडिओचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सिंहनी या वृत्ताला अधिकृत दुजोरा देत सांगितले की, '50 देशामधील जवळपास 4500 स्क्रीनवर हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे. अमेरिका, इंग्लडमध्येदेखील 'बँग बँग'च्या स्क्रिनची संख्या अन्य सिनेमाच्या तुलनेत अधिक राहणार आहे.'
अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत पीव्हीआर सिनेमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम दत्ताने सांगितले की, 'यंदाच्या वर्षातील पाच दिवसांच्या मोठ्या वीकेंडमुळे सुरुवातीपासूनच अॅडव्हान्स बुकिंग सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी सिनेमाला मोठी ओपनिंग मिळेल, अशी आशा आहे.' बिग सिनेमाजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष सक्सेनाच्या मतानुसार, 'कर्पोरेट्स आणि कंपन्यांनी सिनेमाचे एकत्ररीत्या अॅडव्हान्स बुकिंग केले आहे. पाच दिवसांच्या वीकेंडमध्ये हृतिकचा हा सिनेमा प्रेक्षकांसाठी बोनसप्रमाणे आहे.'
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'बँग बँग' या सिनेमाची खास छायाचित्रे...