आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INTERVIEW: ‘बँग बँग’ माझ्या आयुष्याचा इंटरव्हल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता हृतिक रोशन)
तुम्ही देता तेव्हा त्यापेक्षा कित्येक पटीने चांगल्या गोष्टी परत मिळतात. ‘बँग-बँग’च्या एक वर्षाच्या प्रवासात मी खूप काही मिळवले आहे. जुन्या गोष्टी विसरून जोमाने पुढे गेल्यासच यश मिळते. अशा प्रकारच्या प्रयत्नांचे फळ नेहमीच चांगले मिळते, असे हृतिक रोशनने ‘बँगबँग’दरम्यान झालेली दुखापत आणि बिघडलेल्या नातेसंबंधांवर बोलताना म्हटले.
इंडियन सुपरहीरो फ्रँचायझी स्थापन करणारा हृतिक रोशनदेखील सुपरह्युमन बनण्याच्या गोष्टी करतो. तो म्हणतो की, ‘मी गेल्या 15 वर्षांपासून अॅक्शन करतोय. शरीराचा असा कोणताही भाग उरला नाही जिथे जखम नाही. मात्र, हार मानणे माझ्या रक्तातच नाही. ‘बँग बँग’दरम्यान झालेल्या शस्त्रक्रियेनंतर जी अॅक्शन दृश्ये मी स्वत: करू शकत होतो, ती केली नसती तर हा माझा पराभव मानला गेला असता. भावनात्मक आणि व्यक्तिगतरीत्या जीवनात आलेल्या समस्यांचा सामना करत करत मी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. शूटिंगला वेळ लागला, पण मी माझ्या कामावर समाधानी आहे.’ हृतिकने या मुलाखतीद्वारे सर्वांना आनंदी राहण्याचा, सर्वांशी प्रेमाने वागण्याचा आणि आयुष्यातील प्रत्येक संकटाकडे एक आव्हान म्हणून पाहण्याचा संदेश दिला.
या मुलाखतीत हृतिक काय म्हणाला जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...