आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY: 70 वर्षांचे झाले शब्दांचे जादूगार जावेद अख्तर, पाहा सुंदर प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : 2014 मध्ये ख्रिसमस सेलिब्रेट करताना जावेद अख्तर आणि शबाना आझमी

मुंबई- बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर 17 जानेवारी रोजी 70 वर्षांचे झाले आहेत. जावेद अख्तर यांनी सलमान खानचे वडील आणि लेखक सलीम खान यांच्यासोबत मिळून 'जंजीर', 'शोले' आणि 'दीवार' या ब्लॉकबस्टर सिनेमांची पटकथा लिहिली आहे. दिवंगत निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा 1981 मध्ये सिलसिला या सिनेमासाठी गीतकाराच्या शोधात होते. त्याकाळात जावेद अख्तर यांनी इंडस्ट्रीत संवाद लेखक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. यश चोप्रा यांनी सिलसिला या सिनेमातील गाणी लिहिण्याची जबाबदारी जावेद अख्तर यांच्यावर सोपवली. त्यांनी लिहिलेले 'देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए' आणि 'ये कहां आ गये हम' ही गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठी रेंगाळतात.
पाहा, जावेद अख्तर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातील निवडक छायाचित्रे...